बातम्या

अजित पवारांनी संयमाने बोलावे - आर.के. पोवार

Ajit Pawar should speak with patience R K Patil Powar


By nisha patil - 6/2/2024 10:29:59 PM
Share This News:



कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा ग्रामीण व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक जिल्हा अध्यक्ष व्ही. बी.  पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शहराध्यक्ष आर के पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली प्रमुख कार्यकर्त्यांची व्यापक बैठक जिल्हा कार्यालयात संपन्न झाली यावेळी अजित पवार यांचा सर्वांनीच खरपूस समाचार घेतला अजित दादांनी संयमाने बोलावे अन्यथा आम्हालाही बोलता येते याचे भान ठेवावे अशा शब्दात सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या.

बारामतीच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने काही लोक माझी शेवटची निवडणूक आहे अशी काही लोक साथ घालतील परंतु त्याला कुणीही भीक घालू नये अशा शब्दात पवार साहेबांचे नाव न घेता अजितदादांनी साहेबांच्या वर टीका केली हा अकृग्न पणाच मानावा लागेल
शरद पवार साहेबांनी अजित दादांना आपला राजकीय वारसदार म्हणून आज पर्यंत सर्व पदांवर नेऊन बसवले महाराष्ट्रामध्ये पहिल्याच वेळा आमदार आणि पहिल्याच वेळेला कॅबिनेट मंत्री होणारे बहुदा अजितदादा एकमेव असतील याचे कारण फक्त आणि फक्त शरद पवार आहेत आज अजित दादा जे काही आहेत ते फक्त शरद पवारांमुळेच हे त्यांनी विसरू नये.
   

अजित दादा आपण जे महाराष्ट्रामध्ये काम उभे केले आहे ते साहेबांमुळे आज जे काही थोडेफार तुमचे नाव महाराष्ट्रामध्ये झाले आहे त्याला पवार साहेब कारणीभूत आहे थोड्याच दिवसात आपल्याला कळेल की आपण नेमके कुठे आहात आपण ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेला आहात त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही परंतु शरद पवारांवर  टीका करणे हे महाराष्ट्राच्याच जनतेला काय पण हे कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला आवडणारे नाही कारण आपली निर्माण झालेली प्रतिमा ही शरद पवारांमुळे  आहे हे विसरू नका

   

लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य हे घटनेनेच निर्माण केलेले वास्तव आहे परंतु बोलत असताना कोणाची मन दुखावणार नाही याचे भान प्रत्येकानेच ठेवले पाहिजे आपण विरोध जरूर करावा परंतु त्याला वैचारिक अधिष्ठान असावं एवढंच
 

 पवार साहेबांनी कधीच भावनेवर स्वार होत कोणतीही निवडणूक जिंकलेली नाही किंबहुना ते त्यांच्या रक्तात नाही प्रत्येक निवडणुकीच्या वेळी वैचारिक भूमिका घेऊनच आणि बहुजन समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले आहेत त्यामुळे आपण जे बोलता आहात त्याचा समाचार 2024 च्या निवडणुकीमध्ये बारामती काय उभा महाराष्ट्र घेणार आहे आपल्या बेताल वक्तव्यामुळे आपण स्वतःही खड्ड्यात जाल आणि तुमच्यासोबत आलेले त्यांनाही खड्ड्यात घालाल तेव्हा आपण संयमाने बोलावे ही अपेक्षा.
 

सदरच्या बैठकीस कार्याध्यक्ष अनिल घाटगे महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने शहराध्यक्ष पद्मजा तिवले प्रदेश प्रवक्ते राजीव आवळे, शहर सरचिटणीस सुनील देसाई प्रदेश सरचिटणीस अमर चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे बी.के.चव्हाण सुरेश पाटील, प्रदेश प्रतिनिधी निरंजन कदम, हिदायत मणेर विधानसभा अध्यक्ष कोल्हापूर उत्तर विधानसभा अध्यक्ष गणेश जाधव कोल्हापूर दक्षिण विधानसभा अध्यक्ष नितीनभाऊ पाटील किसन कल्याणकर शहर उपाध्यक्ष फिरोज सरगर, शिवाजी पोळ, मुसाभाई कुलकर्णी, दिनकर धोंगडे, सादिक आत्तार व विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजित पवारांनी संयमाने बोलावे - आर.के. पोवार