बातम्या
अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवारांचा वार ; शरद पवार ढाल बनून तयार!
By nisha patil - 12/25/2023 7:00:36 PM
Share This News:
अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवारांचा वार ; शरद पवार ढाल बनून तयार!
अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात दंड थोपटले. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला, नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. तर त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट आव्हान दिलं आहे.
यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पावारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "मी स्वत: संसदीय काम करतो. म्हणजे, मला त्यांचे निर्णय माहितच नसतात. उद्या त्यांच्या संसदीय कामात मी लक्ष देईन का? आणि सतत आमच्यामध्ये चर्चा होत असते. त्या जागेबद्दल काही व्यक्तिगत अडचणी असू शकतात, त्याची चर्चा होते. पण अन्य कुठल्या बाबतीतील वाद त्यांनी कधी माझ्या कानावर घातला नाही, जो घातला तो, मतदार संघाच्या कामांसबंधित होता." पुढे बोलताना ते म्हणाले की, "प्रत्येकाचा जो-तो अधिकार आहे, प्रत्येक राजकीय व्यक्तीचा तो अधिकार आहे. त्यांचं उमेदवार निवडायचे बदलायचे, काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे." त्याच्यावर भाष्य करण्याचं काही कारण नाही.
तुमच्या बंडात आणि अजित पवारांच्या बंडात काय फरक? यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "आमच्या काळात बंड नव्हतं. आम्ही बसून निर्णय घ्यायचो. यात कुठलीच तक्रार नसायाची. आज कुणी काय केलं असेल, त्याच्याही तक्रार करायची कारण नाही. फक्त पक्ष महत्वाचा आहे. त्याचा संस्थापक कोण राहिलेय? लोकांनी या पक्षाला मोठं केलं. या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोरच आहेत. त्यामुळे त्याच्यावर अधिक काही भाष्य करण्याची गरज नाही." असे ते म्हणाले शरद पवारांनी पुण्यातील भीमथडी जत्रेमध्ये उपस्थिती लावली.होती त्यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना ते बोलत होते
अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवारांचा वार ; शरद पवार ढाल बनून तयार!
|