बातम्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अजित पोवार, स्वाभिमानी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी धनाजी पाटील (सावर्डेकर) यांची निवड

Ajit Powar elected as district president of Swabhimani Farmers Association

By nisha patil - 10/12/2024 6:13:02 PM
Share This News:

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अजित पोवार, स्वाभिमानी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी धनाजी पाटील (सावर्डेकर) यांची निवड

जयसिंगपूर ( प्रतिनिधी )  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अजित पोवार व स्वाभिमानी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी धनाजी पाटील ( सावर्डेकर ) यांची निवड करण्यात आली.        
             
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी शिवसेना ( शिंदे गट ) पक्षात प्रवेश केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले होते. रविवारी कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत दोन्ही निवड करण्यात आल्या. त्याबरोबरच लवकरच संपुर्ण कोल्हापूर जिल्हातील तालुकानिहाय दौरा करून स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षाची पुर्ननिवडी करण्याबाबत जिल्हा पातळीवरील पदाधिकारी यांना सुचना देण्यात आल्या. 
 
  यावेळी मा. आमदार सुजित मिणचेकर , राज्य प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे , जयकुमार कोले , पक्षाचे सचिव डॅा. महावीर अक्कोळे , ॲड. शमशुद्दीन सनदे , सांगली जिल्हाध्यक्ष पोपट आण्णा मोरे , युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संजय बेले , संदीप राजोबा , सचिन शिंदे ,डॅा. बाळासाहेब पाटील यांचेसह प्रमुख पदाधिकारी ऊपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अजित पोवार, स्वाभिमानी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी धनाजी पाटील (सावर्डेकर) यांची निवड