बातम्या

अखिल भारतीय मानवाधिकारी असोसिएशन संयुक्त राष्ट्र संघ मानवी हक्क दिल्ली .पुरस्कार वितरण सोहळा...

All India Human Rights Association United Nations Human Rights Delhi Award Distribution Ceremony


By Administrator - 12/26/2023 6:04:18 PM
Share This News:



अखिल भारतीय मानवाधिकारी असोसिएशन संयुक्त राष्ट्र संघ मानवी हक्क दिल्ली .पुरस्कार वितरण सोहळा...

दहा डिसेंबर मानवाधिकार दिना निमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अखिल भारतीय मानवाधिकार असोशियन संलग्न संयुक्त राष्ट्र यांचे वतीने सामाजिक ,राजकीय, शेतकरी ,शैक्षणिक ,डॉक्टर, वकील अशा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना मानवअधिकार पुरस्कार जाहीर केला जातो

याही वर्षी 2023 मध्ये अखिल भारतीय मानवाधिकार असोसिएशन संयुक्त राष्ट्र संघ दिल्ली यांच्यावतीने माननीय श्री नितीन श्रीपती ठीगळे यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याचबरोबर माननीय श्री बंडूलाल मोहम्मद सनदे यांना कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर माननीय श्री युनूस बाबासाहेब मकानदार यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदरचा पुरस्कार सांगली जिल्हा न्यायाधीश माननीय श्री डी. एस. हातरोटे साहेब व हातकलंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री महादेव तोंदले साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार प्रदान करतेवेळी अखिल भारतीय मानवाधिकार असोसिएशन संयुक्त राष्ट्र संघ दिल्लीचे महाराष्ट्र राज्य गव्हर्नर डॉक्टर हाजी दिलावर मकानदार, महाराष्ट्र कायदे सल्लागार एडवोकेट माननीय श्री मेहबूब बानदार, महाराष्ट्र राज्य सल्लागार माननीय श्री सुनीलजी महाजन, महाराष्ट्र राज्य सल्लागार समितजी काबरा, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गजानन शिरगावे, पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दस्तगीर बानदार 

कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर, पश्चिम महाराष्ट्र प्रेस सचिव चंदुलाल फकीर, पश्चिम जिल्हाध्यक्ष अमर ढेरे ,राजू गिरी , हुमन राइट्स महाराष्ट्र राज्य प्रेस रिपोर्टर विकास गायकवाड, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व सांगली जिल्हा न्यायाधीश माननीय श्री डी एस हातरोटे साहेब व हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव तोदले साहेब यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


अखिल भारतीय मानवाधिकारी असोसिएशन संयुक्त राष्ट्र संघ मानवी हक्क दिल्ली .पुरस्कार वितरण सोहळा...