बातम्या
एच एम पी व्ही बाबत सर्व अधिष्ठांनी सतर्क रहावे -वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ
By nisha patil - 7/1/2025 7:54:37 PM
Share This News:
भारतात पहिला एचएमपीव्हीचा रुग्ण बेंगलोर मध्ये सापडला आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकार सतर्क झालय.या विषाणू संदर्भात घाबरण्याचे कारण नाही;काळजी घ्यावी.सर्व अधिष्ठातांनी सतर्क रहावे.असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ यांनी केलय.
जगातील अनेक देशांमध्ये हयुमन मेटा न्युमोनिया व्हायरस ( एचएमपीव्ही ) विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. देशात आजपर्यंत एकून पाच रुग्ण कर्नाटक, तामिळनाडू व गुजरात या राज्यात आढळून आले. त्यापैकी एक रुग्ण पुर्णपणे बरा होवून घरी गेलेला आहे. उर्वरित रुग्ण बरे होत आहेत. हा आजार गंभीर नसून लहान मुलं, वृद्ध आणि इतर गंभीर आजर असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.आज मंत्रालयात या अनुषंगाने घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले, आयुष विभागाचे संचालक डॉ. रमन घुंगराळकर याबरोबरच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता दुरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.
एच एम पी व्ही बाबत सर्व अधिष्ठांनी सतर्क रहावे -वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ
|