बातम्या
कोल्हापूर: पीएम सूर्यघर योजनेचा लाभ सर्व वीज ग्राहकांना घ्यावा – नीता केळकर
By nisha patil - 1/28/2025 7:14:59 PM
Share This News:
कोल्हापूर: पीएम सूर्यघर योजनेचा लाभ सर्व वीज ग्राहकांना घ्यावा – नीता केळकर
कोल्हापूर, २८ जानेवारी २०२५: एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी आज कोल्हापूर परिमंडल कार्यालयात पत्रकार परिषद घेत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंचा लाभ सर्व घरगुती वीज ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी घरगुती ग्राहकांसाठी अनुदानाची माहिती दिली, ज्यामध्ये 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपये, 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये, आणि 3 किलोवॅट किंवा त्यापुढील प्रकल्पासाठी 78,000 रुपये अनुदान उपलब्ध आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेताना नीता केळकर यांनी राज्य सरकारच्या सौर कृषी वाहिनी योजनेंबद्दलही चर्चा केली. स्मार्ट मीटरसाठी ग्राहकांना मार्गदर्शन करत, तंत्रज्ञान स्वीकारण्याचे महत्त्व स्पष्ट केले. याप्रसंगी विविध ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी आणि विभागीय अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर: पीएम सूर्यघर योजनेचा लाभ सर्व वीज ग्राहकांना घ्यावा – नीता केळकर
|