बातम्या

नंदिनी जाधव नगर प्रकल्पास दिलेले सर्व परवाने रद्द करावेत : अध्यक्ष संजय पाटील

All licenses given to Nandini Jadhav Nagar project should be cancelled President Sanjay Patil


By nisha patil - 2/29/2024 4:12:06 PM
Share This News:



नंदिनी जाधव नगर प्रकल्पास दिलेले सर्व परवाने  रद्द करावेत : अध्यक्ष संजय पाटील

कोल्हापूर : ऐतिहासिक कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये रहिवासी वापराच्या नावाखाली परवानगी दिलेला नंदिनी जाधव नगर प्रकल्प प्राधिकरणाच्या पैसे खाऊ अधिकाऱ्यांच्यामुळे अस्तित्वात येत  आहे . कात्यायनी परिसरातून येणारे सात ओढे व नाले आहेत.

मात्र अतिक्रमण करत नाल्याचे पात्र मुजवून वसाहत निर्माण केली जात आहे.अविष्कार इन्फ्रास्ट्रक्चर  नावाच्या  धन दांडग्याला हा भूखंड आदन देण्यात आलेला आहे. त्यांच्या अतिक्रमणामुळे  कळंबा तलाव भरला नाही. सदर अतिक्रमणाकडे ग्रामपंचायत व प्राधिकरण यांनी आर्थिक तडतडी करून सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे प्रमाण की देणाऱ्या तत्कालीन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आणि प्राधिकरण यांनी लाखो रुपये बिल्डर कडून वसूल केलेले आहेत.

तत्कालीन सरपंच आणि प्राधिकरण मुख्याधिकारी यांनी संगणमताने हा प्रकल्प एका बिल्डरच्या घशात घातला लागूनच अंदाजे 20 एकरात शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे याकडे सुद्धा महापालिकेचे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे यामुळे भविष्यात कळंबा तलावाच्या अस्तित्वावर गदा येण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन प्राधिकरण आणि ग्रामपंचायत यांनी दिलेल्या सर्व परवानक्या लेआउट रद्द करून कार्यवाही करावी अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प अस्तित्वात नाही हा कळीचा मुद्दा आहे .कुठल्या नाल्याची रुंदी कमी केली, कुठला नाला बुजवला त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यांमध्ये कसा फेरबदल केला लेआउट किती वेळा बदलला  कशी मान्यता मिळाली याचे सक्षम पुरावे कागदोपत्री आमच्याकडे उपलब्ध आहेत जागेवरचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत त्या पुराव्यांच्या आधारे जिल्हाधिकारी यांनी हा प्रकल्प त्वरित थांबवावा

कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भाग कळंबा तलावावर अवलंबून आहे याचे भान अधिकाऱ्यांनी ठेवावे पोट खराब जमिनीचे संगणमत करून प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी   कोट्यवधी रुपयांचा फायदा बिल्डरला करून दिलेला आहे प्रकल्पाला स्थगिती मिळणा इतके सक्षम पुरावे आमच्याकडे आहेत याची नोंद घेऊन जिल्हाधिकारी यांनी  कार्यवाही करावी अन्यथा कळंबा परिसरातील नागरिकांसह परिवर्तन संघटना, कामगार कर्मचारी संघर्ष युनियन ,अखिल भारतीय चित्रपट कर्मचारी संघटना ,अण्णा माथाडी संघटना, अखिल भारतीय किसान ब्रिगेड या संघटनांचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने जनतेला रस्त्यावर घेऊन उग्र स्वरूपाचे आंदोलन करून प्रकल्प बंद पाडणार असा इशारा संजय पाटील यांनी पत्रका द्वारे दिला आहे.


नंदिनी जाधव नगर प्रकल्पास दिलेले सर्व परवाने रद्द करावेत : अध्यक्ष संजय पाटील