बातम्या

ऊस दरासाठी आता आरपारची लढाई

All out battle now for sugarcane price


By nisha patil - 11/21/2023 4:42:56 PM
Share This News:



 यंदाची पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी, गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता चारशे रुपयांचा मिळावा या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. जिल्हा प्रशासन आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या मात्र यातून कोणताच तोडगा निघाला नाही, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऊस दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती मात्र या समितीच्या शिफारशी मान्य नाहीत, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील कारखानदारांचे पालक झाले आहेत, त्यामुळे आता आरपारच्या लढाईसाठी शेतकरी सज्ज झाला आहे, शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे ज्यादा मिळावे यासाठी गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात झालेल्या  पत्रकार परिषदेत दिला


ऊस दरासाठी आता आरपारची लढाई