बातम्या
हातकणंगले तहसिलदार यांच्या दारात सर्वपक्षीय ७२ तासांचे लक्षनीक उपोषण सुरू
By nisha patil - 9/23/2023 11:29:34 PM
Share This News:
सांगली येथील बेडग गावामध्ये डॅा.बाबासाहेब आंबडेकर यांची स्वागत कमान ग्रामपंचायत ने अनाधिकृत ठरवत ति पाडल्याबद्दल मानगाव ते मुंबई मंत्रालय असा बेडग समाजाच्या वतिने सुरू असलेला लॅांग मार्च च्या समर्थनार्थ हातकणंगले तहसिलदार यांच्या दारात सर्वपक्षीय ७२ तासांचे लक्षनीक उपोषण सुरू आहे
रिपब्लीकन विध्यार्थी सेने चे जिल्हाअध्यक्ष .शिरीष थोरात,रिपब्लीकन पार्टी ॲाफ इंडियाचे खंडू कुरणे दलीत महासंघा चे विलास कांबळे हे या उपोषणात सहभागी आहेत. बेडग येथील डॅा.बाबासाहेब आंबेडकरांची स्वागत कमान झालीच पाहिजे हि प्रमुख मागणी असून डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर प्रेम करणाऱ्या अनूयायानी संबंधीत उपोशनास भेट देण्यचे आवाहन रिपाइं चे जिल्हा नेते सतिश माळगे यांनी केले आहे
.यावेळी रिपब्लीकन पक्षाचे दिपक भोसले,बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष अधिनाथ भाई साठे,स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षा चे अध्यक्ष धनाजी सकटे पूरग्रस्त निवारण समीतीचे दिगंबर सकट , किरण कोठावळे ,विजय गोंधने आदी लोक उपस्थीत होते
हातकणंगले तहसिलदार यांच्या दारात सर्वपक्षीय ७२ तासांचे लक्षनीक उपोषण सुरू
|