बातम्या

शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आवश्यक

All round development of school students is essential


By nisha patil - 7/11/2023 9:15:30 PM
Share This News:



शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आवश्यक 
-शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांचे प्रतिपादन 
-डी. वाय पाटील हॉस्पीटलमध्ये शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी अभियानाचा शुभारंभ

कोल्हापूर  शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या भेडसावत असतात. मुलांच्या शारीरिक व मानसिक विकास होण्याच्या या कलावधीत आरोग्याकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे असतात.  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हि बाब महत्वपूर्ण आहे. त्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या वतीने सुरु करण्यात आलेले शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी अभियान (स्वास्थ) अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी केले. 

   शालेय विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून "शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी हमी अभियान (स्वास्थ)" हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात चोथे बोलत होते. विश्वस्त पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शाळा संघटनेचे अध्यक्ष भरत रसाळे, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. मीना शेंडकर, कोल्हापूर महानगर पालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव, गट शिक्षण अधिकारी विश्वास सुतार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या वतीने वैद्यकीय शिक्षणाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. तज्ञ डॉक्टरांच्या कडून गरजू गोर-गरीब रुग्णांना अत्याधुनिक पध्दतीने मोफत वा माफक दरात उपचार केले जातात. आजपर्यंत कोल्हापूर जिल्हयातील व जिल्हया बाहेरील अनेक रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे. याच सामाजिक जबाबदारीतून "शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी हमी अभियान (स्वास्थ्य)" सुरु करण्यात आले आहे.

प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. मीना शेंडकर यांनी  डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलने शालेय विद्यार्थ्यासाठी एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबविल्या बद्दल संस्थेचे कौतुक केले. या उपक्रमाचा शालेय विद्यार्थ्याना नक्कीच चांगला फायदा होईल असा विश्वास त्यानी व्यक्त केला.

मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. आर.के. शर्मा यांनी हॉस्पीटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली.  ज्या शाळाना विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून घ्यायची आहे त्यानी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आर. के. मुदगल यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शाळेची भूमीका महत्वाची असते. या विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक विकासामध्ये आरोग्य तपासणी महत्वाची असल्याचे सांगितले.
डॉ. निवेदिता पाटील यांनी प्रास्ताविकात लहान मुलांना होणारे आजार व त्यावर हॉस्पीटल मध्ये होणारे मोफत उपचार तसेच "शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी हमी अभियान (स्वास्थ्य)" या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रा. मैथिली पाटील यानी सूत्र संचालन केले. उपकुलसचिव संजय जाधव यानी आभार मानेल.

  यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, श्री. भरत रसाळे, वैद्यकिय अधिक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, विविध विभाग प्रमुख, प्राचार्य त्याचबरोबर संस्थेच्या विविध विद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.  कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी हॉस्पिटलच्या विविध विभाग व सिम्युलेशन सेंटरला भेट देऊन येथील सुविधांचे कौतुक केले. 

कदमवाडी: ‘स्वास्थ’ अभियान शुभारंभ प्रसंगी दीपप्रज्वलन करताना महेश चोथे व पृथ्वीराज पाटील. डावीकडून डॉ. राकेश कुमार शर्मा,  डॉ. आर. के. मुदगल, एस.के. यादव, मीना शेंडकर, विश्वास सुतार आदी.


शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आवश्यक