बातम्या
महाराष्ट राज्यभरातील सगळया सूतगिरण्या एक जुलै २०२३ पासून बंद
By nisha patil - 6/20/2023 10:15:05 PM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे ) महाराष्ट राज्यभरातील सगळया सूतगिरण्या एक जुलै २०२३ पासून बंद ठेवण्याचा निर्णय वस्त्रोद्योग महासंघाने घेतला आहे. मुंबइे येथे महासंघाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. वस्त्रोद्योगात सध्या मंदीचे सावट आहे. कापूस, सूत आणि कापडाच्या दरात मोठी तफावत आहे. यामुळे कापूस आणि सुताच्या दरातील रोजचा तोटा कोटीने होत आहे. वस्त्रोद्योग व्यवसाय व या क्षेत्रातील समस्यांची सोडवणुकीसंबंधी राज्य सरकारकडून ठोस कार्यवाही होत नाही यामुळे राज्यातील सगळया सूतगिरण्या एक जुलैपासून बंद ठेवण्यावर महासंघ ठाम आहे.
मुंबई येथे वस्त्रोद्योग महासंघाची बैठक झाली. या बैठकीनंतर सूतगिरण्या बंद ठेवण्यासंबंधीच्या निर्णयाच माहिती राज्य सरकारला कळविण्यात आल्याचे वृत्त आहे. वस्त्रोद्योग व्यावसायिक सध्या मंदीला सामोरे जात आहेत. व्यावसायिकांसमोर समस्या निर्माण होत आहेत.दरम्यान या स्थितीतही अनेक सूतगिरणी चालकांनी खासगी सावरांकडून पैसे घेऊन व्यवसाय सुरू ठेवला आहे. तोटा सहन करुन अनेकजण व्यवसाय करत आहेत. कामगार सांभाळत आहेत.
मात्र कापूस, सूत व कापडाच्या दरातील तफावतीमुळे तोटा वाढत असल्याने महासंघाने टोकाचा निर्णय घतला आहे. सूतगिरण्यांना प्रति किलो सुमारे ३० रुपयांपर्यंत तोटा होत आहे. सरकारकडून सूतगिरण्यांना प्रती चात्याला अनुदान मिळावे. गेल्यावर्षी घेतलेल्या कापसाला दहा टक्के अनुदान द्या अशा मागण्या व्यावसयिकांच्या आहेत.
सरकारने सूतगिरण्यांना अनुदान आवश्यक आहे. जोपर्यंत सरकार अनुदान देत नाहीत, तोपर्यंत रासूतगिरण्या रुळावर येऊ शकणार नाहीत याकडे व्यावसायिक लक्ष वेधत आहेत. सरकारने याप्रश्नी मध्यस्थी करुन सूतगिरण्यांना अनुदान देण्याची भूमिका अंगिकारली पाहिजे. असे महासंघाचे म्हणणे आहे.
कामगारावर बेरोजगारीची वेळ
राज्यातील सूतगिरण्यामध्ये कामगारांची संख्या मोठी आहे. सूतगिरण्या बंद राहणार असल्यामुळे राज्यातील सूतगिरणीतील कामगारावर बेरोजगारीची वेळ येणार आहे. सरकारने या प्रश्नी हस्तक्षेप करुन सूतगिरण्या बंद होणार नाहीत यादृृष्टींने पावले उचलावीत. लाखो कामगारांशी निगडीत हा व्यवसाय आहे.
महाराष्ट राज्यभरातील सगळया सूतगिरण्या एक जुलै २०२३ पासून बंद
|