बातम्या

नागपूर कारागृहांमध्ये बंदिस्त असलेले कथित नक्षलवादी जी. एन. साईबाबासह पाच जणांची आज अखेर नागपूरच्या सेंट्रल जेलमधून निर्दोष मुक्तता:

Alleged Naxalist G who is confined in Nagpur jails N Five persons including Sai Baba finally acquitted from Nagpurs Central Jail today


By nisha patil - 7/3/2024 10:32:26 PM
Share This News:



नागपूर कारागृहांमध्ये बंदिस्त असलेले कथित नक्षलवादी जी. एन. साईबाबासह पाच जणांची आज अखेर नागपूरच्या सेंट्रल जेलमधून निर्दोष मुक्तता:

 नक्षलवादाला मदत करत देशाविरोधात लढा पुकारल्याचा आरोप असलेला जी.एन. साईबाबांसह पाच सहकाऱ्यांना निर्दोष मानत आज अखेर नागपूरच्या सेंट्रल जेलमधून मुक्त करण्यात आले आहे. नुकतेच नागपूरच्या सेंट्रल जेलमधून त्यांना तब्बल पाच वर्षांनंतर अखेर आज मुक्त करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचच्या नागपूर खंडपीठाने 5 मार्चला दहशतवादी कारवाया प्रकरणात जी एन साईबाबांसह त्याच्या इतर सहकाऱ्यांना निर्दोष ठरवत कारागृहात बंद असलेल्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरून आज जी एन साईबाबा  आणि त्याच्या इतर चार सहकाऱ्यांना निर्दोष ठरवत आज त्यांची सुटका करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने डीयूचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा आणि इतर चार जणांना माओवादी संबंध प्रकरणात दोषी ठरवत 2017 च्या सत्र न्यायालयाच्या आदेशात बदल केला आहे. या प्रकरणी जन्मठेपच्या निकालाला आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर आता नागपूर खंडपीठाकडून जी एन साईबाबांसह पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि तत्कालीन सरकारसह सर्वांनाच हा मोठा धक्का मानला जात आहे.UAPA लावताना नियमानुसार कारवाई झाली नव्हती. तसेच, साई बाबा आणि इतर आरोपींच्या संबंधित ठिकाणावरुन पुरावे खासकरून डिजिटल पुरावे गोळा करताना नियम पाळले नव्हते. तसेच प्रोसिक्युशनने ठेवलेले पुरावे जी एन साई बाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध सिद्ध करू शकले नाही. या आधारावर जी एन साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका करण्यात आली आहेजी. एन. साईबाबा आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने 7 मार्च 2017 रोजी नक्षलवादी कारवाईच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात जी.एन. साईबाबा आणि इतर सहकाऱ्यांनी नागपूर खंडपीठात अपील दाखल करत सत्र न्यायालयाचे निर्णयाला आव्हान दिले होते. नागपूर खंडपीठात 7 सप्टेंबर 2023 रोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन निर्णय राखीव ठेवण्यात आला होता. नागपूर खंडपीठ आज या संदर्भात मोठा निकाल दिला आहे.दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक असलेले जी. एन. साईबाबा यांना वर्ष 2013 मध्ये नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली कमांडर नर्मदा अक्काला भेटायला आलेल्या काही जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर प्राध्यापक जी.एन. साईबाबांचा नक्षलवाद्यांशी संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. गडचिरोलीमध्ये काही जणांच्या अटकेनंतर पोलिसांनी दिल्लीत साईबाबांच्या घरावर छापेमारी करत झडती घेतली. त्यात अनेक डिजिटल पुरावे मिळून आल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर साईबाबाला पोलिसांनी अटक केली होती.


नागपूर कारागृहांमध्ये बंदिस्त असलेले कथित नक्षलवादी जी. एन. साईबाबासह पाच जणांची आज अखेर नागपूरच्या सेंट्रल जेलमधून निर्दोष मुक्तता: