बातम्या

अल्लू अर्जुनच खरा सुपरस्टार !

Allu Arjun is the real superstar


By nisha patil - 12/16/2023 5:13:38 PM
Share This News:



दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'पुष्पा 2: द रूल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या या चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. या सगळ्यात आता माहिती समोर आली आहे की अल्लू अर्जुननं दारूच्या जाहिरातीसाठी नकार दिला आहे. त्या ब्रँडची इच्छा होती की जेव्हा पण पुष्पा चित्रपटात धुम्रपान करेल किंवा तंबाकू खाईल तेव्हा ते सगळं स्क्रिनवर दाखवण्यात यावं. त्यासाठी त्या ब्रॅंडनं निर्मात्यांना तब्बल 10 कोटींची ऑफर देखील दिली होती. 
       

मिळालेल्या माहितीनुसार ,  या ब्रॅंडनं चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपटातील ते सीन दाखवण्यासाठी तब्बल 10 कोटींची ऑफर दिली होती. मात्र, अल्लू अर्जुननं याला असं म्हणतं नकार दिला की तो अशा कोणत्याही ब्रँडची जाहिरात करू इच्छीत नाही. अल्लू अर्जुननं कोणत्याही जाहिरातीला नकार देण्याची ही पहिली वेळ नाही. 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर एका तंबाकूच्या ब्रँडनं छोट्या पडद्यासाठी जाहिरात करण्यासाठी खूप मोठी रक्कम देण्याचे सांगितलं होतं. मात्र, अल्लू अर्जुननं त्या ऑफरला नकार दिला


अल्लू अर्जुनच खरा सुपरस्टार !