बातम्या

अल्लू अर्जुन ठरला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता'; 'पुष्पा: द राइज' साठी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार,

Allu Arjun wins Best Actor


By nisha patil - 8/25/2023 7:53:31 PM
Share This News:



69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा काल 24 ऑगस्ट ला करण्यात आली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनला  'पुष्पा: द राइज' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा होताच अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर जल्लोष केला. 

अनेकांनी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर फटाके फोडले. तसेच अल्लू अर्जुननं त्याच्या घराबाहेर येऊन फोटोग्राफर्ससमोर फोटोसाठी पोज दिली.  
अल्लू अर्जुनला  'पुष्पा: द राइज' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अनेकांनी पुष्पा द राइज हा चित्रपट पाहिला असेल, पण ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही,ते हा चित्रपट घरबसल्या पाहू शकतात. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर  तुम्ही 'पुष्पा: द राइज'  हा चित्रपट पाहू शकता.  

पुष्पा चित्रपटाचे शूटिंग आंध्र प्रदेशमधील मारेदुमिली या जंगलामध्ये झाले. पुष्पा द राइज हा चित्रपट चंदनावर आधारित आहे. त्यामुळे चंदनाच्या तस्करीचा सिन शूट करण्यासाठी जंगलामध्ये काही गाड्या आणाव्या लागत होत्या. या गाड्या जंगलामध्ये आणण्यासाठी जंगलामध्ये रस्ता तयार करावा लागला होता. शूटिंग दरम्यान चित्रपटाची संपूर्ण टीम जंगलामध्ये जात होती. टीमला जंगलामध्ये  जाण्यासाठी जवळपास 300 गाड्या लागत होत्या.


अल्लू अर्जुन ठरला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता'; 'पुष्पा: द राइज' साठी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार,