बातम्या
सातवे येथे आळोबानाथ पालखी सोहळा उत्साहात संपन्न..
By nisha patil - 2/14/2025 12:07:21 PM
Share This News:
सातवे येथे आळोबानाथ पालखी सोहळा उत्साहात संपन्न..
सातवे (ता पन्हाळा ) येथे आळोबानाथ वर्धापन दिनानिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. "आळोबाच्या नावाने चांगभलं!" च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊली, आळोबानाथ आणि संत सेवागिरी महाराजांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. या पालखी मिरवणुकीत घोडे, रथ, उंट यांचा समावेश होता, त्यामुळे सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
यावेळी आटपाडी (जि. सांगली) येथून तब्बल १०० जणांचे पारंपरिक पथक सहभागी झाले होते. तसेच सेवागिरी महाराज पथकाचे प्रमुख जाधव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा पार पडला. प्रमुख मार्गांवरून पाच ते सहा तास दिंडी सोहळ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या दिंडी सोहळ्यात केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी, शिशू विहार शाळेचे पथक, कुंभोज येथील लेझीम पथक, श्री आळोबानाथ भजनी मंडळ, बालभारती वाद्यवृंद, श्रीराम वारकरी शिक्षण संस्था (आरेवाडी, कराड) आणि विविध महिला मंडळ पथके सहभागी झाली होती.
सोहळ्याची सांगता पुंडलिक देवकर महाराज यांच्या कालाकीर्तनाने झाली. यावेळी यशस्वी फाऊंडेशनच्या अध्यक्षा विनिता जयंत पाटील,डॉ. जयंत पाटील,डॉ.स्वाती पाटील, आमदार डॉ. विनय कोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन दर्शन घेतले.दुपारी एक वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडळे तसेच सातवे पथक यांच्यावतीने पाणी शुद्धीकरण महाप्रसादाचे नमुने व रुग्णांच्या वरती उपचार करण्यात आले या वेळी महाप्रसादाचा दहा ते पंधरा हजार भक्तांनी लाभ घेतला. या सोहळ्यामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. आयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी बोरपाडळेहून श्रीकांत कुं भार
सातवे येथे आळोबानाथ पालखी सोहळा उत्साहात संपन्न..
|