बातम्या

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रशिक्षण सुद्धा महत्वाचे - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Along with education training for students is also important


By nisha patil - 9/1/2025 12:19:34 PM
Share This News:



 शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञान आणि सैद्धांतिक माहिती प्रदान करते तर प्रशिक्षण त्यांच्या कौशल्यांची आणि प्रत्यक्ष अनुभवाची जोपासना करते.  विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात  यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुंबईत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांची छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. विविध राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर आहेत. या विद्यार्थ्यांची मंत्री श्री.पाटील यांनी विचारपूस केली.

मंत्री पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 21 व्या शतकातल्या युवकांचे विचार, आशा आणि आकांक्षा लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. यामध्ये आंतरशाखीय विषयांच्या अभ्यासावर भर, शिक्षणाची उपलब्धता आणि शिक्षणामध्ये प्रवेश, मातृभाषेमध्ये शिक्षण,जागतिक एकात्मतेवर भर यावर अधिक लक्ष केंद्रित करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे.त्याची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.त्यामुळे शिक्षण आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रशिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाची व्यावहारिक उपयुक्ततता शिकवते, जे पुढे जाऊन त्यांना नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते, असे सांगून मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असेही सांगितले.


विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रशिक्षण सुद्धा महत्वाचे - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
Total Views: 32