माजी विदयार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विकासात योगदान द्यावे- डॉ. श्रुती जोशी, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर

Alumni should contribute to the development of the college


By nisha patil - 5/8/2024 9:10:39 PM
Share This News:



शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ध्येयवाद व त्यागातून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था उभी राहिली. या संस्थेच्या विदयार्थ्यांनी शिक्षणक्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी करुन शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, कला, क्रीडा आणि साहित्य्‍ा क्षेत्रात देश विदेशात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. विवेकानंद कॉलेजच्या माध्यमातून  माजी विदयार्थ्यांची एक युवाशकती उभी राहिली असून या युवाशक्तीच्या माध्यमातून देशाचे भवितव्य्‍ा घडत आहे, असे प्रतिपादन डॉ. श्रुती जोशी, आय.क्यू.ए.सी. समन्वयक, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर यांनी केले. त्या विवेकानंद कॉलेज माजी विदयार्थी संघटनेने आयोजित केलेल्या ऑनलाईन मेळाव्यात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि माजी विदयार्थी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते.      

अध्यक्षीय भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. आर. आर कुंभार  यांनी,  माता, मातृभूमी आणि मातृसंस्था यांचे ऋण प्रत्येकाने सांभाळले पाहिजे.  माजी विदयार्थ्यानी  त्यांच्या अनुभवाचा उपयोग आजी विदयार्थ्यांना करुन दिला पाहिजे. जगभरातील अनेक नामंकित संस्थाच्या विकासात तेथील माजी विदयार्थी संघटनेचा हातभार असतो. त्यामुळे या महाविद्यालयाच्या विकासातहीमाजीविदयार्थ्यांनीपुढेयेणेगरजेचेआहे,शिक्षणमहर्षीं  डॉबापूजी साळुंखे यांच्या विचारातून  उभे राहिलेल्या विवेकानंद कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांची परंपरा उज्ज्वल असून आजच्या घडीला देशविदेशात माजी विद्यार्थी अनेक सामाजिक, सामाजिक,आर्थिकसांस्कृतिकराजकीयसाहित्य्, कला आणि क्रीडा इत्यादी  क्षेत्रात बहुमोल कामगिरी बजावत   आहेत  असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेच्या सदस्या डॉ. सारीका पाटील यांनी केले, आभार भूगोल विभाग प्रमुख डॉ.जी.एस.उबाळे यांनी मानले तर सूत्रसंचालन  डॉ. सुप्रिया पाटील  यांनी केले. यावेळी विवेकानंद कॉलेजचे माजी विद्यार्थी व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कौस्तुभ गावडे, माजी विदयार्थी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.एन आर रानभरे, सचिव डॉ. धिरज शिंदे व माजी विदयार्थी ऑनलाईन सहभागी झाले होते.  


माजी विदयार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विकासात योगदान द्यावे- डॉ. श्रुती जोशी, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर