बातम्या
आळवे सरपंच डॅा. वसंत पाटील शब्दाचे पक्के
By nisha patil - 10/3/2024 10:07:41 PM
Share This News:
आळवे सरपंच डॅा. वसंत पाटील शब्दाचे पक्के
काम बोलतयं म्हणून सरपंचांचे नाव गाजतयं
ग्रामस्थांना शब्द दिला आणि काम पुर्ण केले
पन्हाळा - प्रतिनिधी व्यवसायाने डाँक्टर असतानाही गावाच्या विकासासाठी काहीतरी करायचे म्हणून ठरवले आणि ते तडीस नेलेही.. राजकारणात नेहमी व्यक्तीकेंद्रीत आणि स्वहित जोपासण्याला अधिक झुकतं माप दिलं जात त्याचबरोबर राजकारणात आश्वासने ही केवळ निवडणूक जिंकण्यासाठी वापरलेली एक क्लूप्ती असते पण काही व्यक्ती या सर्वांच्या पलीकडे जावून केवळ समाजहिताचे राजकारण करण्याला प्राधान्य देतात, आश्वासने देण्यापेक्षा शब्द देतात आणि त्या शब्दाला पक्के राहतात! आणि आम्हांला सांगायला अत्यंत अभिमान वाटत आहे की सरपंच डॅा. वसंत भिमराव पाटील यांनी आपला शब्द खरा करुन दाखवलाय आणि सरपंच पद हे फक्त मिरवण्याचे साधन नसून जटील प्रश्न सोडवण्याचे एक माध्यम आहे हे तुम्हीं सिध्द ही केल आहे.
आज कोणाला आठवतही ही नसेल पण नोव्हेंबर २०२२ ला जेंव्हा शाळेच्या संदर्भात एक गाव मिटींग झाली होती त्यावेळी उमेदवारी अर्ज सुध्दा भरला नसतानं या माणसाने स्वत: ५ लाख रुपये शाळेच्या बांधकामासाठी जाहीर केले आणि दिलेही, एवढ्यावरच न थांबता जर का मला सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिलीत तर दोन वर्षाच्या आत नवीन शाळा इमारतीचा प्रश्न मार्गी लावेन हा शब्द दिला आणि उद्या दिनांक १० मार्च २०२४ या दिवशी नवीन शाळा इमारतीचा भूमिपूजन समारंभ होत आहे. अवघ्या सव्वा वर्षाच्या काळात आपला शब्द खरा करुन दाखवून आपण “बोले तैसा चाले” या उक्तीचा प्रत्यय आम्हांला करुन दिलात. राजकीय क्षेत्रात अनेक लोकं कार्यरत आहेत; पूर्णवेळ राजकीय क्षेत्रात काम करुनदेखील अनेक प्रस्थापित राजकारण्यांना आजवर जे जमलं नाही ते तुम्हीं अगदीच कमी कालावधीत पूर्णवेळ राजकारणात सक्रीय न राहता ही करुन दाखवलयं..!
ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हांला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवलं त्या सर्व लोकांचा विश्वास तुम्हीं वृध्दींगत केला आहे. आम्हीं सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्यासारखा सरपंच आम्हांला लाभला.असे गावकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.
आळवे सरपंच डॅा. वसंत पाटील शब्दाचे पक्के
|