विशेष बातम्या

कसबा बावड्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार राजेश क्षीरसागर

Always committed to the development of Kasba Bawda


By nisha patil - 3/16/2025 11:08:26 PM
Share This News:



कसबा बावड्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर, दि. १६ : "कसबा बावडा आणि शिवसेनेचे अतूट नाते आहे. कसबा बावड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे," असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

कसबा बावड्यातील विविध विकासकामांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. राजाराम बंधाऱ्याच्या पर्यायी पुलासाठी निधी, राजाराम बंधारा ते कसबा बावडा रस्ता, तिरंगा लाईट बसवणे, हनुमान तलावाचे सुशोभिकरण, तसेच अंतर्गत रस्ते आणि पाणीपुरवठा यासारखी महत्त्वाची कामे करण्यात आली आहेत.

आमदार क्षीरसागर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत कसबा बावडा मेनरोड, एस.आर.पी. कॅम्प, दत्त मंदिर ते राजर्षी शाहू जन्मस्थळ, तसेच कागलवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या पेव्हर पद्धतीने डांबरीकरणासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांचे उद्घाटन आज आमदार क्षीरसागर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले, "कसबा बावडा हा कोल्हापूर शहराचा अविभाज्य भाग आहे. येथील नागरिकांना मुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. काही जणांनी जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला, मात्र सुज्ञ जनतेने माझ्यावर विश्वास ठेवत मला पाठबळ दिले. निवडणुका येत-जात राहतील, पण आपले नाते कायम राहील. आगामी काळात उर्वरित विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल," अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमास शिवसेना समन्वयक सुनील जाधव, कृष्णा लोंढे, शिवाजी जाधव, अनिल कदम, आनंद पालकर, संकेत बिरंजे, पांडुरंग पालकर, सचिन पाटील, अनिल जाधव, सुरत सुतार, जय लाड, दादासो आळवेकर, सचिन पवार, निलेश पिसाळ, कपिल पवार, राकेश चव्हाण, धवल मोहिते, प्रज्वल चव्हाण, अक्षय निकम आदी मान्यवर उपस्थित होते.


कसबा बावड्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार राजेश क्षीरसागर
Total Views: 36