बातम्या

नेहमी सुंदर दिसायचंय मग व्यायाम कराच…

Always want to look beautiful


By nisha patil - 6/1/2024 7:22:19 AM
Share This News:



खरंतर आपल्याकडे व्यायाम करणे म्हणजे वजन कमी करणे असा एक गैरसमज आहे. पण व्यायामाचे अनेक फायदे आहेत. व्यायामामुळे फक्त तुमचे आरोग्य चांगले राहत नाही तर तुमच्या सौंदर्यासाठीही व्यायाम खूप फायदेशीर आहे. व्यायाम सौंदर्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. चेहऱ्यावर पुरळ, सुरकुत्या, रूक्ष त्वचा अशा त्वचेच्या समस्यांवर व्यायाम खूपच फायदेशीर आहे.
त्वचा चमकदार होते

 

तुम्ही जेव्हा व्यायाम करता, त्यावेळी तुमच्या हृदयाचे ठोके जलद होतात. तुम्हाला अधिक ऑक्सिजनची गरज भासते. त्यामुळे तुमच्या शरीरात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. शरीरातील रक्तात हे ऑक्सजिन मिसळते आणि ऑक्सिजनमुळे त्वचा चमकदार बनते.
सुरकुत्या कमी होतात

 

व्यायामामुळे ताणतणावाशी संबंधित असलेले कॉर्टिसॉल हार्मोन्स नियंत्रणात राहतात. कॉर्टिसॉल जास्त झाल्यास त्वचेला तरुण ठेवणाऱ्या कोलेजन या प्रोटिनची पातळी कमी होते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येतात. शरीरात कोलेजनची निर्मिती करण्यास व्यायामाची मदत होते.
चेहऱ्यावरील पुरळपासून मुक्ती
नियमित व्यायाम केल्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनपुरवठा योग्य राहतो. त्यामुळे त्वचा मुलायम होते. व्यायामाने निघणाऱ्या घामामुळे त्वचेतील छिद्रं मोकळी होतात. शरीरातील विषारी घटक घामावाटे बाहेर निघतात. त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येत नाहीत. त्यामुळे व्यायामानंतर येणारा घाम त्वरित पुसा. तसंच मेकअप करून व्यायाम करणं टाळा.

 

निरोगी केस
 

व्यायामामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे केस मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. केसांची वाढही होते. व्यायामामुळे तणाव कमी होतो. तणाव कमी झाल्यानं केसही कमी गळतात.


नेहमी सुंदर दिसायचंय मग व्यायाम कराच…