विशेष बातम्या
उन्हाळ्यामध्ये पुदीन्याच्या पानांपासून मिळतात जबरदस्ते फायदे, जाणून घ्या!
By nisha patil - 6/19/2023 8:55:46 AM
Share This News:
आपण कोणताही पदार्थ बनवत असताना तो आणखी छान दिसावा यासाठी कोथिंबीर टाकतो.
कोथिंबीरमुळे
त्या पदार्थाला एक वेगळी चव येते.
तसंच याप्रमाणेच पदार्थांमध्ये आणखी चव येण्यासाठी पुदीन्याच्या पानांचा वापर आवर्जून केला जातो. पुदीन्याची पाने ही पदार्थांची चव वाढवण्याचं काम करतातच सोबतच ते आपल्या शरीरासाठी देखील उपयुक्त असतात.
पुदीन्याची पाने ही शरीराला शीतलता देतात. तसंच ते अनेक आजारांपासून संरक्षण देखील करतात. या पुदीन्यांच्या पानांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी, मेन्थॉल, व्हिटॅमिन-ए, कॉपर, कार्बोहायड्रेट यांसारखे पोषक घटक असतात. जर लोकांना मळमळ, गॅस, ॲसिडीटी अशा समस्यांचा त्रास होत असेल तर अशा वेळी या पानांचा वापर करून पाहा तुम्हाला नक्की आराम मिळू शकतो.
जर कोणाला पचनाच्या समस्या असतील तर त्यांनी पुदीन्याचा वापर जरूर करावा. कारण पुदीन्यात जंतूनाशक गुणधर्म असतात जे अपचन दूर करण्यास मदत करतात. तसंच ही पाने पोटदुखी देखील दूर करतात. त्यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम हवा असेल तर पुदिन्याचे पाणी नक्की प्या.
दमा असलेल्या रूग्णांसाठी पुदीना खूप फायदेशीर ठरतो. कारण यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे नाकातील त्रासापासून आराम देतात. त्यामुळे जर तुम्हालाही दम्याचा त्रास असेल तर तुम्ही पुदिन्याच्या पाण्याची वाफ घेऊ शकता.
बहुतेक लोकांना डोकेदुखीचा त्रास असतो तर अशा लोकांनी पुदिन्याच्या पानांचा वापर करावा. या पानांमधील मजबूत आणि ताजेतवाना सुगंध डोकेदुखी कमी करण्यास मदत करू शकतो. तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर पुदिन्याच्या तेलाने किंवा मिंट बामने मसाज करा ज्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल.
उन्हाळ्यामध्ये पुदीन्याच्या पानांपासून मिळतात जबरदस्ते फायदे, जाणून घ्या!
|