बातम्या
अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याला गती
By nisha patil - 6/12/2023 4:38:45 PM
Share This News:
अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याला गती
आठ दिवसात सल्लागार नियुक्ती
जानेवारी सादर होणार आराखडा
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याला आता गती आली आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या आठ दिवसांत ती पूर्ण होणार आहे.यामुळे जानेवारी महिन्यात हा आराखडा राज्य शासनाला सादर होईल, याद़ृष्टीने प्रक्रिया सुरू आहे
अंबाबाई मंदिरात दरवर्षी भाविकांची संख्या वाढत चालली आहे. राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून भाविक कोल्हापुरात येऊ लागले आहेत. भाविकांच्या वाढत्या संख्येने पुरविण्यात येणार्या सेवासुविधा आणि सुरक्षितता, याकरिता अंबाबाई मंदिर परिसरात कॉरिडोर तयार करण्यात येणार आहे. याकरिता या परिसराचा पुनर्विकास करण्याचा विचार असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अंबाबाई मंदिराभोवतालचा सर्व परिसर खुला करून त्याचा योग्यप्रकारे विकास केला जाणार आहे. त्याद्वारे भाविकांना सुविधा देण्याबरोबरच सुरक्षिततेच्या द़ृष्टीनेही आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. याकरिता अंबाबाई मंदिराच्या चारही बाजूला, भाऊसिंगजी रोड, जोतिबा रोड, महाद्वार रोड आणि बिनखांबी गणेश मंदिर रस्ता, असा सुमारे साडेतीन एकरचा परिसर विकसित होणार आहे.
अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याला गती
|