बातम्या

अंबाबाई मंदिर परिसर विकास, रस्त्यांसह शहरातील सर्व विकासकामे जलदगतीने पूर्ण करा...

Ambabai temple complex development


By nisha patil - 6/14/2024 8:11:24 PM
Share This News:



अंबाबाई मंदिराभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक व ध्वनीयुक्त विद्युत खांब बसविणे, पार्किंग व्यवस्था, शहरातील रस्ते, रंकाळा तलाव व पंचगंगा घाटावरील विद्युत रोषणाई, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाचा विकास, भुयारी गटारीव्दारे सांडपाणी व्यवस्थापन, शहरात विद्युत खांब बसविणे यांसह शहर परिसरातील विविध विकास कामे जलद गतीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.
 

पालकमंत्री  मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महानगरपालिका उपायुक्त साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शहर परिसरातील विविध विषयांचा आढावा घेऊन सूचना केल्या.


अंबाबाई मंदिर परिसर विकास, रस्त्यांसह शहरातील सर्व विकासकामे जलदगतीने पूर्ण करा...