बातम्या

राष्ट्रवादी च्या वतीने आंबेडकर जयंती साजरी

Ambedkar Jayanti celebrations on behalf of NCP


By nisha patil - 4/14/2024 5:07:35 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  ऐतिहासिक बिंदू चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी महापौर महादेवराव आडगुळे, सुनील देसाई, मुसाभाई कुलकर्णी, महादेव पाटील, गणेश जाधव, गणेश नलवडे, रियाज कागदी, संजय शिंदे,अविनाश शिंदे, नितीन मस्के, जीवन पाटील इत्यादी सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


राष्ट्रवादी च्या वतीने आंबेडकर जयंती साजरी