बातम्या
उद्या ओढ्यावरील आंबिल यात्रा
By nisha patil - 5/1/2024 10:37:22 PM
Share This News:
उद्या ओढ्यावरील आंबिल यात्रा
"कोल्हापूर - उद्या शनिवारी दि. ६ रोजी ओढ्यावरील आंबिल यात्रा होणारय. यानिमित्तानं ओढ्यावरील रेणुका मंदिरात जय्यत तयारी सुरुय. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेवून देवीच्या दर्शनासाठी महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र दर्शन रांगांची सोय करण्यात आलीय. यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी शंभर स्वयंसेवक कार्यरत असणारयत.
सौदंती यात्रेनंतर कोल्हापुरात होणाऱ्या आंबिल यात्रेला मोठंं महत्व आहे. सौदत्तीला गेलेले कोल्हापुरातील मानाचे चार जग हे आज सांयकाळी ५ वाजता कोल्हापुरात दाखल होतील. शनिवारी पहाटे चार वाजता ओढ्यावरच्या रेणुका मंदिरात या मानाच्या जगांची पूजा, रेणुका देवीची दुग्धाभिषेक अलंकार पूजा आणि नैव्यद्य दाखवल्यानंतर देवीच्या आंबिल यात्रेला सुरुवात होणारय, असं यात्रा कमिटीच्या सदस्यानं सांगितलं. मार्गशिर्ष पोर्णिमेला भरणा-या या आंबिल यात्रेला कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येनं असल्यानं या परिसराची स्वच्छता करण्यात आलीय. परिसरात पुजेचे साहित्य, खाद्य पदार्थ आणि खेळण्यांचे स्टॉलही उभारले जातायत. शनिवारी रात्री दहा वाजता या यात्रेची सांगता होणारय. जवळपास २ लाख भाविक या आंबिल यात्रेला येतील असा अंदाज असून भाविकांना रेणुका देवीचं दर्शन घेता यावं यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीच्या सदस्यांनी दिली.
उद्या ओढ्यावरील आंबिल यात्रा
|