बातम्या
सौ अंबुबाई पाटील इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा...
By nisha patil - 6/22/2024 10:34:01 PM
Share This News:
सौ अंबुबाई पाटील इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा...
यावेळी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले..
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली..
कागल : आज 21 जून जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सौ अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये योग दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री डॉक्टर नानासाहेब पाटील सर लाभले. व्यासपीठावर शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. के. डी पाटील सर, प्राध्यापक तेजस पाटील सर, मुख्याध्यापिका सौ. एस. के. पाटील मॅडम, उपप्राचार्य सौ.केसरकर मॅडम, उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. नानासाहेब पाटील यांनी योगाचे महत्त्व, पंचमहाभूताचे महत्त्व यांची माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री.वसंत सुतार सर यांच्या स्वयं दृष्टिकोन विकास कार्यक्रम या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
आपल्या शाळेच्या शिक्षिका सौ. नीलम जाधव मॅडम यांनी यावेळी योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली.सर्व विद्यार्थी व पालक यांनी योग प्रात्यक्षिके यावेळी केली.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सौ.एस. के. पाटील मॅडम यांनी आभार मानताना योग विद्या आपल्या जीवनामध्ये का महत्त्वाची आहे हे सांगितले.
या कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक अध्यक्ष, प्राचार्य, मुख्याध्यापिका, उपप्राचार्य सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
सौ अंबुबाई पाटील इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा...
|