बातम्या

चांगभलं च्या गजरात जोतिबा डोंगरावर नगर दिंडी सोहळा उत्साहात

Amidst the alarm of Changbhal the Nagar Dindi


By nisha patil - 4/9/2023 5:37:29 PM
Share This News:



श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी प्रत्येक वर्षी ज्योतिबा डोंगरावर पारंपारिक नगर प्रदक्षिणा अर्थात दिंडी सोहळा संपन्न होतो याही वर्षी श्री जोतिबा देवाची आरती झाल्यानंतर आज सकाळी भक्तीमय वातावरणात नगर दिंडीला सुरुवात झाली . गुलालाची मुक्त उधळण हजारो भाविकांची उपस्थिती आणि टाळ मृदुंगाचा अखंड गजर अशा वातावरणात नगर दिंडीचा लवाजमा बाहेर पडला या नगरदिंडीमध्ये बारा ज्योतिर्लिंगे आणि अष्ट तीर्थ यांच्या दर्शनासाठी p महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून भाविक उपस्थित राहतात. प्रतिवर्षीप्रमाणे कोल्हापुरातील सहज सेवा ट्रस्टच्या वतीने याही वर्षी ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेल्या भाविकांसाठी गायमुख परिसरामध्ये प्रसादाचे वाटप करण्यात आलं यामध्ये खिचडी केळी चहा यांचा समावेश होता सुमारे तीन 3 000 किलो खिचडी आणि २५ हजारांवर केळीचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं यासाठी सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रत्येक वर्षी सहज सेवा ट्रस्टने या ठिकाणी जोतिबा चैत्र यात्रा आणि नगर दिंडी सोहळा दरम्यान भाविकांना प्रसादाचे वाटप करत आपल्या समाजसेवेचे व्रत जपलं आहे.


चांगभलं च्या गजरात जोतिबा डोंगरावर नगर दिंडी सोहळा उत्साहात