बातम्या

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल

Amit Shah and Devendra Fadnavis strongly attacked the Maha Vikas Aghadi


By nisha patil - 7/23/2024 9:59:25 PM
Share This News:



आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांनी महाविकास आघाडीवर  जोरदार टीका केली शरद पवार हे भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी आहेत,  तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार , नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांना मराठा आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा, असे आव्हान दिले. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शाह-फडणवीसांवर निशाणा साधला आहे.   

नाना पटोले म्हणाले  काल पुण्यात घोषणांचा पाऊस आणि धमकीवजा कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. ⁠फडणवीस साहेबांच्या बुद्धिमत्तेची कीव वाटते. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेले आरक्षण ते टिकवू शकले नाहीत. अशी टीका त्यांनी यावेळी केली.


अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल