बातम्या
अब की बार 400 पार'वर अमित शाह स्पष्ट वक्तव्य म्हणाले...
By nisha patil - 2/29/2024 4:15:04 PM
Share This News:
दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत होईल अशी चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे. लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता असून राजकीय पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभीमीवर वेगवेगळे सर्वेक्षणांची आकडेवारी समोर येत आहे. बुधवारी म्हणजेच 28 फेब्रवारी रोजी यवतमाळमधील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी अब की बार 400 पारची घोषणा दिली. अनेक सर्वेक्षणांमध्ये मोदीच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल असं सांगितलं जात आहे. मात्र असं असतानाच खरोखरच भाजपाची कामगिरी कशी असेल याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने या प्रश्नाला उत्तर दिलं.
एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये अमित शाहांनी वेगवेगळ्या राजकीय विषयांवर भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये अमित शाहांना शेवटचा प्रश्न किती जागांवर भाजपा जिंकेल असा विचारण्यात आला. "2024 च्या निवडणुकीचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल. तुमचा पक्ष संशोधन, आकडेवारी आणि सर्वेक्षणासाठी ओळखला जातो. अमित शाहांचं सर्वेक्षण काय सांगतं?" असा प्रश्न अमित शाहांना मुलाखतीच्या शेवटी विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाहांनी, "कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. मोदींनी सांगितलं आहे की 400 पार तर निश्चितपणे 400 पार करणार. यासंदर्भात मनात कोणतीही शंका ठेवण्याची गरज नाही," असं थेट उत्तर दिलं. शाहांचा हा आत्मविश्वास पाहून सभागृहामध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
अब की बार 400 पार'वर अमित शाह स्पष्ट वक्तव्य म्हणाले...
|