बातम्या

अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित

Amit Shahs Maharashtra tour has been postponed


By nisha patil - 2/13/2024 7:33:10 PM
Share This News:



मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह येत्या 15 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांची 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर येथे सभा पार पडणार होती. त्यासाठी जय्यत तयारीदेखील सुरु होती. पण त्यांचा 15 फेब्रुवारीचा दौरा अचानक स्थगित करण्यात आला आहे. हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झालं होतं. प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना आणि काळजी घेतली जात होती. पण त्यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांआधीच त्यांचा दौरा स्थगित करण्यात आला आहे. त्यांचा दौरा स्थगित होण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

अमित शाह यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावेळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नेते अशोक चव्हाण यांचा भाजप पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता. पण त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आजच पार पडला आहे. त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित