बातम्या

महिलांबद्दल चुकीचे भाष्य करणाऱ्याला थेट अमिताभ बच्चन यांनी झापले...

Amitabh Bachchan directly snaps at someone who made wrong comments about women


By nisha patil - 8/29/2024 2:47:41 PM
Share This News:



अमिताभ बच्चन हे काैन बनेगा करोडपतीचे नवीन सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. . काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी काैन बनेगा करोडपतीच्या सेटवरील काही खास फोटो शेअर केले होते. काैन बनेगा करोडपतीच्या सेटवर एका स्पर्धकाला अमिताभ बच्चन हे थेट म्हणाले की, नेहमी पत्नी बरोबर असते हे कायमच लक्षात ठेव.
   

 कृष्णा सेलूकर  हा आपला अनुभव सांगताना दिसला. मात्र, यावेळी त्याने घरी राहणाऱ्या लग्न न झालेल्या मुलींबद्दल अत्यंत हैराण करणारे विधान केले. त्यानंतर अमिताभ बच्चन हे त्याला फटकारताना दिसले आहेत.  कृष्णा सेलूकर म्हणाला की, कोरोनाच्या काळात माझी नोकरी गेली. इंजिनिअर असूनही मला घरी बसावे लागले. कृष्णा म्हणाला, सर तुम्हाला सांगतो की, ज्यावेळी लग्न न झालेली मुलगी घरच्यांसाठी ओझे असते…तसेच नोकरी नसलेला तरूणही त्याच्या घरच्यांसाठी ओझे बनतो. कृष्णा याला थांबवत अमिताभ बच्चन यांनी मोठे भाष्य केले.
       

अमिताभ बच्चन हे म्हणाले की, महिला या कधीच ओझे होत नाहीत. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की, मुलगी कधीच ओझे होत नाही. खूप मोठी शान महिला असतात, असेही यावेळी त्यांनी म्हटले.  नेहमीच अमिताभ बच्चन हे काैन बनेगा करोडपतीच्या मंचावर त्यांचे काही अनुभव शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते


महिलांबद्दल चुकीचे भाष्य करणाऱ्याला थेट अमिताभ बच्चन यांनी झापले...