बातम्या

अमोल कोल्हेंची अजित पवारांवर जहरी टीका

Amol Kolhens venomous criticism of Ajit Pawar


By nisha patil - 4/16/2024 4:45:10 PM
Share This News:



महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांना धारेवर धरलं. चोरलेली गोष्ट कोण अभिमानाने मिरवत का? आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत का? असे थेट सवाल करत  कोल्हे यांनी स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा यांचा वस्तुपाठ ग्रामस्थांना दाखवून दिला.अमोल कोल्हे आज आंबेगाव शिरुर तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत. 
अमोल कोल्हे यांनी महायुतीच्या सर्वच नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की माननीय मुख्यमंत्री महोदय दोन वेळा, नागपूरकर मुख्यमंत्री दोन वेळा मतदारसंघात आले असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. तर बारामतीकर उपमुख्यमंत्री सात आठ वेळा शिरूर मतदारसंघात आले. भाजपचे मंत्री, शिंदे सेनेचे मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले. एवढे सगळे मंत्री येऊन गेले, आता उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री ही येतील. पण माझ्या सर्वसामान्य मतदाराला कळतंय. एवढे सगळे मंत्री, मुख्यमंत्री एका सामान्य शेतकऱ्याचा पोराला घेरायला येत असतील तर ही ताकद एकट्या अमोल कोल्हेची नाही. तर सर्वसामान्य जनतेची ताकद आहे, असं म्हणत अमोल कोल्हेंनी थेट बोलून दाखवलं आहे.

 

पुढे बोलताना ते म्हणाले की,  कांद्यावरची निर्यातबंदी उठावी यासाठी निलंबन पत्करले, तिकीट मिळावं म्हणून बेडुक उडी  मारली नाही. मी पाच वर्षात काय केलं हे विचारता अडीच वर्षे कोरोनामध्ये गेली हे सोयीस्कर विसरल जातं. अस सांगत गेल्या पाच वर्षात केलेल्या कामगिरीचा उल्लेख करत 20 वर्षे आणि 5 वर्षे अशी तुलना करणाऱ्यांना चपराक लगावली. त्यासोबतच दोन एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये पीएम किसान निधी दिला जातो, अर्थात दिवसाला 17 रुपये देऊन शेतकऱ्यांचा अपमान केला जातोय.  एकीकडे दोन एकर कांदा उत्पादन करण्याऱ्या शेतकऱ्याचं 7 लाख 20 हजार रुपयांचं नुकसान होत आहे. त्यावर बोलताना डॉ. कोल्हे यांनी दोन एकरचा हिशोब सांगितला. दोन एकर शेतात २४ टन कांदा उत्पादित केला जातो. एका किलोमागे 30 रुपयांचे नुकसान या केंद्र सरकारने केले अर्थात 24 टनाचे 7 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान होत आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. 


अमोल कोल्हेंची अजित पवारांवर जहरी टीका