बातम्या

भरपावसात विद्युत पुरवठा केला सुरू

Ample electricity supply started


By nisha patil - 7/24/2023 4:43:48 PM
Share This News:



रुकडी मध्ये वार शनिवार रात्री अचानकपणे ग्रामपंचायतिचे पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत केबल वरती जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे दोन झाडे अचानक कोसळल्यानंतर ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा रात्री ठप्प झाला होता .रविवारी सकाळी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या कार्य तत्परतेमुळे व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे शाखा अभियंता तसेच सर्व कर्मचारी यांच्यामुळे तुटलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा भर पावसामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने युद्ध पातळीवर काम करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आले त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचे ग्रामस्थांच्याकडून कौतुक होत आहे हे काम करत असताना रुकडीचे उपसरपंच  राजकुमार मोहिते, मा उपसरपंच शितल खोत, उपसरपंच शमुवेल लोखंडे, रमेश कांबळे, संतोष रुकडीकर, ग्रा प सदस्य  राहुल माने, ग्रा प सदस्य  सिकंदर पेंढारी, संजय कांबळे, राजू सुतार, सचिन इंगळे, सुधीर लोखंडे, शाखा अभियंता श्री देसाई  आणि म रा वी म चे सर्व कर्मचारी आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन ग्राम पंचायतीचा खंडित झालेला पाणीपुरवठा यशस्वीरित्या चालू करण्यात आला, त्यामुळे या सर्व लोकांनी मोलाचं सहकार्य केल्याबद्दल नागरिकांच्यातून त्या सर्वच टीमचं  कौतुक होत आहे.


भरपावसात विद्युत पुरवठा केला सुरू