बातम्या

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेचा रोमँटिक अंदाजाने वेधले चहात्यांचे लक्ष

Amrita Deshmukh and Prasad Jawade's romantic comedy caught the attention of the audience


By nisha patil - 7/26/2023 6:02:34 PM
Share This News:



बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय जोडी अर्थात अमृता देशमुख  आणि प्रसाद जवादे यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला.अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी नुकतेच त्यांचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.अमृता आणि प्रसाद यांच्या या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. फोटोमध्ये दोघेही ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहेत.अमृता आणि प्रसाद हे दोघेही या फोटोमध्ये रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहेत.अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये When Harry Met Sally या चित्रपटामधील एक डायलॉग लिहिला आहे.आणि शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या घरात त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.


अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेचा रोमँटिक अंदाजाने वेधले चहात्यांचे लक्ष