बातम्या
MBBS विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत संपवले आयुष्य
By neeta - 12/29/2023 5:22:23 PM
Share This News:
यवतमाळ : यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील एका एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुहानी ढोले अस मृत विद्यार्थिनीचे नाव असून या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना काल, 28 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत विद्यार्थिनी यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आत्महत्यांचे कारण अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
घटनास्थळी दोन पानांचे पत्र
मृत विद्यार्थिनी सुहानी ढोले ही यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. मात्र तिने हे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा का संपवली, या बाबत अद्याप कुठलीही माहिती कळू शकलेली नाही. या प्रकरणाचा तपास यवतमाळ शहर पोलीस करत आहे. पोलिसांना घटनास्थळी दोन पानाचे पत्र आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या पत्रात मृत विद्यार्थिनीने नेमके काय लिहले आहे, हे अद्याप कळू शकले नाही. तसेच मेडिकल कॉलेज प्रशासन देखील या प्रकरणी काहीही बोलण्यास तयार नसल्याने या प्रकरणाचे कारण काळू शकले नाही. यवतमाळ शहर पोलिसांनी या प्रकरणा गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू केली आहे.
MBBS विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत संपवले आयुष्य
|