बातम्या

'महाराष्ट्राची संस्कृती जपणारा कलाकार', चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

An artist who preserves the culture of Maharashtra


By nisha patil - 9/9/2024 7:54:38 PM
Share This News:



बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. अनेक सेलिब्रिटी इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देतात. अभिनेता रितेश देशमुख महाराष्ट्राची संस्कृती जपणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. आता पुन्हा एकदा त्याचं हे रुप पाहायला मिळालं आहे
 

रितेश देशमुख याने घरीच गणपती बाप्पाची मातीची मूर्ती साकारली. त्याच्यासोबत चिमुकल्यांनी ही आपल्या हातांनी लाडक्या बाप्पााला आकार दिला. या इको-फ्रेंडली गणपती बाप्पाची त्यांनी पुजा केली. त्यानंतर घरच्या घरीच इको-फ्रेंडली पद्धतीने छोट्या टबमध्ये बाप्पाचं विसर्जन केलं. या इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही यावर कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.


'महाराष्ट्राची संस्कृती जपणारा कलाकार', चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव