बातम्या

शेतीपंपाची चोरी झाल्याने कोल्हापूरातील कासारी नदी काठावरील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण....

An atmosphere of fear among the farmers on the banks of the Kasari river in Kolhapur due to the theft of a farm pump


By nisha patil - 11/27/2023 5:35:34 PM
Share This News:



कोल्हापुरातील कासारी नदी काठावरील सहा मोटरपंपासह दोन नळ पाणी पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत साहित्यांची अज्ञाताकडून चोरी करण्यात आली आहे तरी पोलिसांनी त्याठिकाणी गस्त घालावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील येवलुज-पोर्ले दरम्यानच्या बंधार्‍याशेजारील कासारी नदी काठावरील सहा मोटर पंपासह दोन नळपाणी पुरवठा योजनेच्या विद्युत केबल चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. मोटर पंपांची तोडफोड करून त्यातील तांब्याच्या तारा आणि महत्त्वाचे स्पेअर पार्ट काढून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 


शेतीपंपाची चोरी झाल्याने कोल्हापूरातील कासारी नदी काठावरील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण....