बातम्या
मतदाराकडून ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न
By nisha patil - 7/5/2024 8:38:22 PM
Share This News:
माढा मतदारसंघात येणाऱ्या सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदारकेंद्रावरील हा प्रकार समोर आली आहे. दुपारी तीन वाजताची ही घटना आहे. या घटनेमध्ये दोन ईव्हीएम आणि सोबत असलेले बॅलेट हे तांत्रिक साहित्य जळालं आहे.
राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. मतदाराकडून ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. सांगोला तालुक्यातील बादलवाडीमधील ही घटना आहे. सांगोल्यातील बादलवाडीत मतदाराकडून ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
मतदाराकडून ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न
|