बातम्या

गारगोटी : राज्यात शांततेच्या मार्गाने झालेली मराठा आरक्षणाची आंदोलने दडपण्याचा झाला प्रयत्न

An attempt was made to suppress the peaceful Maratha reservation protests in the state


By nisha patil - 5/9/2023 5:09:50 PM
Share This News:



गारगोटी : राज्यात शांततेच्या मार्गाने झालेली मराठा आरक्षणाची आंदोलने दडपण्याचा झाला प्रयत्न  

राज्य शासनाकडे जर ताकद व हिंमत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ वटहुकूम काढून हा मार्गी लावावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी कूर (ता. भुदरगड) येथे जनसंवाद पदयात्रेनिमित्त आयोजित काॅंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले. माजी आमदार दिनकरराव जाधव प्रमुख उपस्थित होते.
 

आमदार पाटील म्हणाले, ६०-७० वर्षात काँग्रेसने सामान्य माणसाला आधार देण्याचे काम केले. आज देशातील वातावरण समाधानकारक नाही. लोकाभिमुख सरकार देशात आणि राज्यात नाही.
समाजातला कुठलाही घटक आज खूश नाही. यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही. दररोज चाललेल्या घटना बघितल्या तर केंद्र सरकार या देशातल्या १३० कोटी लोकांसाठी आहे की फक्त दोन लोकांसाठी आहे असा प्रश्‍न पडत आहे. 
 

जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून भाजपविरोधात जनसामान्यांच्या मनात असलेला राग लक्षात येत आहे. याउलट काँग्रेसबद्दल लोकांच्या मनात असलेली प्रेमाची भावना स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात काँग्रेसची मोठी ताकद असून हे संघटन अधिक बळकट करण्यासाठी जनसंवाद यात्रा महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील म्हणाले, काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी व जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या जनसंवाद पदयात्रेमुळे काॅंग्रेस कार्यकर्त्यात मोठा झंझावात निर्माण झाला आहे. त्यामुळे राजकीय बदल अटळ असल्याचे सांगितले. यावेळी माजी उपसभापती सत्यजित जाधव, सचिनदादा घोरपडे यांनी मनोगते व्यक्त केली.
 

तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजयसिंह सरदेसाई, बिद्री कारखान्याचे माजी संचालक प्रकाश देसाई, आर. व्ही. देसाई, एस. एम‌ पाटील, पी. डी. पाटील, दिनकरराव कांबळे,  तालुकाध्यक्षा शुभांगी जाधव, गारगोटी शहराध्यक्ष अनुराधा चव्हाण, सपना गोजारे, सविता वर्णे आदींसह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राजू काझी यांनी मानल.


गारगोटी : राज्यात शांततेच्या मार्गाने झालेली मराठा आरक्षणाची आंदोलने दडपण्याचा झाला प्रयत्न