राजकीय

मंत्रालयातून महत्त्वाची फाईल गायब!

An important file missing from the Ministry


By nisha patil - 6/22/2023 5:13:00 PM
Share This News:



मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त रडारवर आले असतानाच आता मंत्रालयातून स्टुडिओ अद्यावतीकरणाची महत्त्वाची फाईल गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयातून स्टुडिओ अद्यावतीकरणाची फाईल गहाळ झाली आहे. ही फाईल नेमकी कोणी आणि का गायब केली, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपसंचालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मंत्रालयाच्या तळमजल्यावर शासनाच्या विविध योजनांच्या चित्रफिती तसेच मंत्र्यांच्या आणि सनदी अधिकारी यांच्या मुलाखतीचे चित्रीकरण करण्यासाठी २०१५ मध्ये स्टुडीओ बांधण्यात आला. दरम्यान, कार्यालयातील नस्तीचे वर्गीकरण करत असताना स्टुडीओच्या अद्ययावतीकरणाची फाईल गहाळ झाल्याचे लक्षात आले.
सदर स्टुडीओची शासनाकडून मान्यता घेण्यापासून ते उभारणी करण्यापर्यतची सर्व कागदपत्रे (शासनाला पाठवलेला प्रस्ताव, शासन मान्यता, टेंडर प्रक्रिया इत्यादी.) स्टुडीओचे अद्ययावतीकरणाची ही फाईल आहे.


मंत्रालयातून महत्त्वाची फाईल गायब!