बातम्या

राजकीय वादाचं पर्यवसन हत्येमध्ये झाल्याने घटना

An incident where a political dispute turned into a murder


By nisha patil - 7/5/2024 4:15:52 PM
Share This News:



भूम तालुक्यातील पाटसांगवी गावातील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्राच्या परिसरात  वाद झाला. मतदान केंद्रावर मतदान आणण्यावरून  वाद झाला आणि त्यानंतर त्याचं पर्यवसन मोठ्या भांडणात झालं. त्यातून एका गटाने दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केला. समाधान पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे. तर ज्याने चाकू हल्ला केला त्या आरोपीचं नाव गौरव अप्पा नाईकनवरे असं आहे. राज्याच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागलं असून धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळच झालेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी ही हत्येची घटना घडली आहे. राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती असून या ठिकाणचे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
 

दोन गटांतील वादाचं पर्यवसन चाकू हल्ल्यात झालं आणि त्यात एकाचा मृत्यू झााल. या हल्ल्यात इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


राजकीय वादाचं पर्यवसन हत्येमध्ये झाल्याने घटना