बातम्या

कोल्हापूर ऐतिहासिक विमानतळावर आता आनंद महिंद्रा ही फिदा...!

Anand Mahindra now at Kolhapur historical airport


By nisha patil - 1/15/2024 1:32:26 PM
Share This News:



कोल्हापूर ऐतिहासिक विमानतळावर आता आनंद महिंद्रा ही फिदा...! 

कोल्हापूर विमानतळ अत्याधुनिक सुविधा आणि यंत्रसामग्रीने सज्ज

कोल्हापूर :  एकेकाळचा उदासीबुवाचा मळा आज हायटेक एअरपोर्ट झाला आहे. कोल्हापूर विमानतळाचे रुपडे आता अत्याधुनिक सुविधा आणि यंत्रसामग्रीने सज्ज झालाय. विशेष म्हणजे इमारत साकारताना कोल्हापूरची ऐतिहासिक परंपरा ही जपण्यात आली आहे.  विमानतळाच्या या अस्सल कोल्हापुरी ऐतिहासिक लूकची आता उद्योजक आनंद महिंद्रा यांनाही भुरळ पडली आहे.
   

कोल्हापूर विमानतळाचा हा नवा लूक  सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या नव्या लुकचे फोटो उद्योजक आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे ते म्हणाले, या नव्या ऐतिहासिक लूक बदल आदर आहे. स्टील कास आणि क्रोमरकर आधारित असेंबली लाईन विमानतळाचे डिझाईन न करता स्थानिक इतिहास आणि स्थापत्य कलेवर आधारित एक वेगळी ओळख निर्माण करणारा विमानतळ उभारण्यात आले आहे. असे ते म्हणाले.येणारा काळात कोल्हापूर विमानतळावरून मोठ्या शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी लवकरच सुरू होणार आहे.. त्यामुळे कोल्हापूर रहिवासांना मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी सोयीस्कर होणार आहे.. विमानतळ विस्तारीकरणाच्या कामासाठी केंद्र सरकारकडून 272 कोटींचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात आले आहे तसेच नव्या टर्मिनल इमारतीचेही काम करण्यात आले टर्मिनल इमारतीसाठी 72 कोटींचा निधी देण्यात आला होता या निधीतून इमारतीला नवा ऐतिहासिक लोक देण्यात आला आहे.


कोल्हापूर ऐतिहासिक विमानतळावर आता आनंद महिंद्रा ही फिदा...!