बातम्या

अनंत अंबानी-राधिका मर्चेंट 12 जुलैला अडकणार लग्नबंधनात

Anant AmbaniRadhika Merchant will get married on July 12


By nisha patil - 5/30/2024 7:07:49 PM
Share This News:



  देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी  आणि राधिका मर्चेंट  यांच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. अनंत-राधिका येत्या 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. शाही थाटात मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. या दिमाखदार लग्नसोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. वेडिंग कार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा लग्नसोहळा 12 जुलै 2024 रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडणार आहे. पारंपारिक हिंदू रितीरिवाजानुसार त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. 12 ते 14 जुलैदरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडले.  12 जुलैला शुभविवाह पार पडेल. 12 जुलैला शुभा आशिर्वाद  आणि 14 जुलैला मंगल उत्सव पार पडणार आहे. 12 जुलैसाठी पारंपारिक ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे. तर 13 जुलैला इंडियन फॉर्मल असा ड्रेसकोड आहे. त्यानंतर 14 जुलैला भारतीय पेहराव ठेवण्यात आला आहे. अनंत-राधिकाचं लक्षवेधी वेडिंग कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


अनंत अंबानी-राधिका मर्चेंट 12 जुलैला अडकणार लग्नबंधनात