विशेष बातम्या

आणि आर्थर रोड जेल हादरला!

And Arthur Road Jail shook


By nisha patil - 6/13/2023 4:41:54 PM
Share This News:



 तारा न्यूज वेब टीम मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातच कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन कैद्यांनी एका कैद्याला अडवून अत्याचार केले, तसेच नंतर मारहाणही केली. रविवारी ही घटना उजेडात आली. पीडित कैद्याने तक्रार दिल्यानंतर ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार पुडी अर्थात समीर शेख आणि फराज यांना अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातंर्गत अटक करण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली असून, त्यांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलेले आहे.समीर शेख उर्फ पुडी आणि राशीद फराजअशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पीडित 23 वर्षीय कैद्याने दिलेल्या तक्रारीनुसार 7 जून रोजी पुडी आणि फराजने त्याला बाथरुममध्ये अडवले. त्यानंतर दोघांनी त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचारानंतर 9 जून रोजी आरोपींनी त्याला शिवीगाळही केली.


आणि आर्थर रोड जेल हादरला!