बातम्या
...अन् मुख्यमंत्री शिंदे सुरक्षारक्षकावरच भडकले
By nisha patil - 4/11/2023 8:34:25 PM
Share This News:
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झाल्यानंतर आपल्या हक्काचा माणूस मुख्यमंत्री झाल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री झाल्यानंतरदेखील त्यांच्या अवतीभवती कार्यकर्त्यांचा गराडा कायम दिसतो. मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या हक्काचे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या सोबत फोटो काढण्याची इच्छा कार्यकर्त्यांना असते.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा मनाशी बाळगून ठाण्यातील खासगी निवासस्थानाबाहेर आलेल्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला ताफा थांबवला. या वेळी फोटो काढण्याची कार्यकर्त्यांनी विनंती केली. त्या विनंतीला मान देत, या कार्यकर्त्यांसोबत शिंदे यांनी फोटोही काढले. मात्र, या वेळी फोटो काढताना कार्यकर्त्यांना सुरक्षारक्षकाने हटकले. कार्यकर्त्यांना हटकणाऱ्या सुरक्षारक्षकावर मुख्यमंत्री शिंदे चांगलेच भडकले.
यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी कार्यकर्त्यांची विचारपूस केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. आपल्या कार्यकर्त्यांचा हट्ट मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्यामुळे कार्यकर्तेही चांगलेच खूश झाले, पण मुख्यमंत्री शिंदे सुरक्षारक्षकावर भडकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
...अन् मुख्यमंत्री शिंदे सुरक्षारक्षकावरच भडकले
|