बातम्या
आणि सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अतिप्रसंग करण्यासाठी दिली 100 रुपयांची सुपारी...
By nisha patil - 1/30/2025 7:36:35 PM
Share This News:
आणि सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अतिप्रसंग करण्यासाठी दिली 100 रुपयांची सुपारी...
पुण्यात धक्कादायक घटना! सातवीतील विद्यार्थ्याचा अमानवी कृत्याचा कट उघड
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्याच वर्गातील मुलीवर अत्याचार करण्याचा कट आखला आणि तिची हत्या करण्यासाठी नववीतील एका मुलाला 100 रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दौंड पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका आणि एका महिला शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची अधिक चौकशी सुरू असून, समाजात वाढत्या बालगुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
आणि सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अतिप्रसंग करण्यासाठी दिली 100 रुपयांची सुपारी...
|