बातम्या

आणि ..स्वरा भास्करच्या त्या वक्तव्यावर वाद

And controversy on that statement of Swara Bhaskar


By nisha patil - 2/21/2025 5:57:30 PM
Share This News:



आणि ..स्वरा भास्करच्या त्या वक्तव्यावर वाद


छावा सिनेमाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री स्वरा भास्करने वादग्रस्त पोस्ट केली होती, ज्यामुळे ती टीकेच्या केंद्रस्थानी आली. संपूर्ण देशभरातून तिच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना अखेर स्वराने स्पष्टीकरण दिलं आहे.

स्वरा भास्कर म्हणाली, "मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर वारशाचा आणि योगदानाचा पूर्ण आदर करते. विशेषतः सामाजिक न्याय आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेचाही मला आदर आहे. मात्र, इतिहासाचा गैरवापर करून सध्याच्या चुका झाकण्याचा प्रयत्न होऊ नये. इतिहासाने लोकांना एकत्र आणले पाहिजे, फूट पाडण्यासाठी किंवा समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी नव्हे."

तिच्या या स्पष्टीकरणावरही संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, ‘छावा’ सिनेमाच्या यशासोबत हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे.


आणि ..स्वरा भास्करच्या त्या वक्तव्यावर वाद
Total Views: 41