बातम्या

आणि त्यामुळे आमिर रिनाचा घटस्फोट झाला........ 

And thats why Aamir Reena got divorced


By nisha patil - 3/13/2024 4:42:14 PM
Share This News:



बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळेही चर्चेत असतो. आमिर खानने रिना दत्तासोबत पहिला विवाह केला होता. या जोडप्याला दोन मुले आहेत. अनेक वर्ष संसार केल्यानंतर आमिर-रिनाचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरने किरण रावसोबत विवाह केला. या दोघांना एक मुलगादेखील आहे. काही वर्षापूर्वीच आमिर आणि किरणचा घटस्फोट झाला. एका मुलाखतीत किरण रावने आमिरच्या पहिल्या घटस्फोटाबाबत गौप्यस्फोट केला आहे. माझ्यामुळे आमिर आणि रिनाचा घटस्फोट झाला नसल्याचे किरण रावने स्पष्ट केले. 
 

आमिर खान आणि रिना दत्ता यांनी लगान प्रदर्शित झाल्याच्या एक वर्षानंतर 2002 मध्ये घटस्फोट घेतला. किरण राव ही लगानची सहाय्यक दिग्दर्शिका होती. त्यामुळे किरण रावमुळेच आमिरचा पहिला घटस्फोट झाला असे अनेकांना वाटते. नुकत्याच एका मुलाखतीत  किरण रावने या घटस्फोटाबाबत भाष्य केले आहे. आमिर खानसोबत आपण 2004 पासून डेटिंगला सुरुवात केली असल्याचे किरण रावने स्पष्ट केले. 

किरणने पुढे म्हटले की, ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीशी विवाह करता आणि दुसरा एखाद्या नात्यात आहे,  त्यावेळी तुमच्यावर एक मानसिक ओझं असते, ज्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होतो. मी कपल काउंसलिंगवर जोर देते.  आमिर आणि मी कपल काउंसलिंग केली होती असेही तिने सांगितले.  
आमिर खान आणि किरण राव हे 2005 मध्ये विवाह बंधनात अडकले. त्यानंतर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही त्यांच्यात चांगले बाँडिंग असल्याचे दिसून आले आहे. काही महिन्यापूर्वीच आमिर खानची मुलगी आयरा खानच्या विवाह सोहळ्यात किरण रावदेखील उपस्थित होती. आमिर खान हा किरण रावच्या लापता लेडिज या चित्रपटाचा सहनिर्माता आहे.  


आणि त्यामुळे आमिर रिनाचा घटस्फोट झाला........