बातम्या
आणि आपल्या मुलांच्या आकस्मिक निधनाने आईनेही सोडला अखेरचा श्वास....
By nisha patil - 8/7/2024 2:28:03 PM
Share This News:
कोपर्डे येथील शेतात काम करण्यासाठी गेलेल्या स्वप्नील कृष्णा पाटील व सुहास कृष्णा पाटील या दोन सख्ख्या भावांचा विजेच्या विद्युत तारेचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला होता.कोपार्डे (ता. शाहूवाडी) येथे अतिउच्च विद्युतभारीत तारेचा स्पर्श होऊन दोन सख्ख्या भावांचा बुधवारी करुण अंत झाला. या घटनेचा मुलांच्या आईला जबर मानसिक धक्का बसला आहे.
मुलांच्या वियोगाने या मातेच्या डोळ्यांतील अश्रूदेखील थिजले आहेत. तरुण असणाऱ्या या दोन मुलांचा मृत्यूचा धक्का त्यांच्या मातोश्री नंदाताई कृष्णा पाटील वय 60 यांना बसला आणि या धक्क्यातून स्वतःला सावरू शकला नाहीत. आणि आज त्यांचा मृत्यू झाला. तरुण असणाऱ्या दोन मुलांच्या अशा आकस्मिक निधनाने नंदाताई कृष्णा पाटील त्यांना मोठा धक्का बसला होता. मुलांच्या मृत्यूनंतर त्यांनी अन्न पाणी सोडलं होतं. आपली मुले परत येतील या आशेने त्या वाट पाहत होत्या.पण मानसिक धक्का बसल्याने व अन्न पाणी सोडल्याने त्यांचा अखेर आज मृत्यू झाला. व आपल्या मुलांच्या विवंचनेने त्यांनी अखेरचा श्वास सोडला. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
आणि आपल्या मुलांच्या आकस्मिक निधनाने आईनेही सोडला अखेरचा श्वास....
|