बातम्या

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आंदोलन अंकुशची तिसरी पूर परिषद संपन्न

Andolan Ankush's third flood conference concluded at Srikshetra Nrisimhwadi

By nisha patil - 6/17/2024 8:19:37 PM
Share This News:

काल श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आंदोलन अंकुश ची  तिसरी पूर परिषद संपन्न झाली  भविष्यात महापुराचे संकट या भागावर येऊ द्यायचं नाही हा निर्धार सर्वांनी केला  शासनाने महापुराचे नियंत्रण करावे म्हणून कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या वतीने एकूण 10 ठराव या पूर परिषदेत मंजूर केले.
 
१) भारत सरकार केंद्रीय जलआयोगाच्या जानेवारी २०१८ च्या मार्गदर्शक तत्वानुसार धरणातील साठा नियंत्रीत करावा.

२) भारत सरकार केंद्रीय जलआयोगाच्या नोव्हेंबर २०१८ च्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात सतत समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणी पातळी ३१ जुलैपर्यंत ५१३.६० ते ३१ ऑगस्टपर्यंत ५१७.०० मीटरपेक्षा जास्त ठेऊ नये.

३) कृष्णा खोऱ्यातील सर्व जलाशयांचे परिचलन एकात्मिक पध्दतीने करणे आवश्यक आहे.

४) दरवर्षी रोहिणी नक्षत्राचेवेळी म्हणजे २६ मे ते २८ मे दरम्यान सर्व कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यातील हिप्परगी बॅरेजमधील बर्गे तळातून काढावेत.

५) संपुर्ण कृष्णा खोऱ्यात राज्यस्तरीय पूरनियंत्रण मंडळे अथवा समित्या गठीत कराव्यात. त्यात स्थानिक तज्ञ प्रतिनिधी असावेत. तसेच जिल्हास्तरीय समिती गठीत करून त्यांचेही मार्गदर्शन घ्यावे.

६) पूरकाळात सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजना चालू करून दुष्काळी भागास पाणी द्यावे.

७) महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ मधील तरतुदींनुसार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीपात्रातील अतिक्रमणे हटवणे तसेच नदी जलप्रदुषण संदर्भात कारवाई करण्यासाठी या कायद्याचा प्रभावीपणे वापर करावा.

८) नदी काठावरील शहरास येऊन मिळणारे ओढे व नाले प्लॅस्टिकमुक्त व पूर्ण क्षमतेने रिकामे करावेत.

९) सर्व नागरीकांना दररोज कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूध

काल श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आंदोलन अंकुश ची 
तिसरी पूर परिषद संपन्न झाली 
भविष्यात महापुराचे संकट या भागावर येऊ द्यायचं नाही हा निर्धार सर्वांनी केला 
शासनाने महापुराचे नियंत्रण करावे म्हणून कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या वतीने एकूण 10 ठराव या पूर परिषदेत मंजूर केले.

१) भारत सरकार केंद्रीय जलआयोगाच्या जानेवारी २०१८ च्या मार्गदर्शक तत्वानुसार धरणातील साठा नियंत्रीत करावा.

२) भारत सरकार केंद्रीय जलआयोगाच्या नोव्हेंबर २०१८ च्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात सतत समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणी पातळी ३१ जुलैपर्यंत ५१३.६० ते ३१ ऑगस्टपर्यंत ५१७.०० मीटरपेक्षा जास्त ठेऊ नये.

३) कृष्णा खोऱ्यातील सर्व जलाशयांचे परिचलन एकात्मिक पध्दतीने करणे आवश्यक आहे.

४) दरवर्षी रोहिणी नक्षत्राचेवेळी म्हणजे २६ मे ते २८ मे दरम्यान सर्व कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यातील हिप्परगी बॅरेजमधील बर्गे तळातून काढावेत.

५) संपुर्ण कृष्णा खोऱ्यात राज्यस्तरीय पूरनियंत्रण मंडळे अथवा समित्या गठीत कराव्यात. त्यात स्थानिक तज्ञ प्रतिनिधी असावेत. तसेच जिल्हास्तरीय समिती गठीत करून त्यांचेही मार्गदर्शन घ्यावे.

६) पूरकाळात सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजना चालू करून दुष्काळी भागास पाणी द्यावे.

७) महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ मधील तरतुदींनुसार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीपात्रातील अतिक्रमणे हटवणे तसेच नदी जलप्रदुषण संदर्भात कारवाई करण्यासाठी या कायद्याचा प्रभावीपणे वापर करावा.

८) नदी काठावरील शहरास येऊन मिळणारे ओढे व नाले प्लॅस्टिकमुक्त व पूर्ण क्षमतेने रिकामे करावेत.

९) सर्व नागरीकांना दररोज कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा नद्यांची पाणी पातळी, पडलेला पाऊस, सर्व धरणातील पाण्याची पातळी व पाणीसाठा याची माहिती एकत्रित करून कळवावी. तसेच पूरक्षेत्रातील नागरिकांना पूर संरक्षणाबद्दल मार्गदर्शन देऊन सतर्क व प्रशिक्षित करावे.

१०) प्रत्येक जिल्ह्यामध्ये जल वैज्ञानिक अधिकाऱ्याची नेमणूक करावी.

गंगा नद्यांची पाणी पातळी, पडलेला पाऊस, सर्व धरणातील पाण्याची पातळी व पाणीसाठा याची माहिती एकत्रित करून कळवावी. तसेच पूरक्षेत्रातील नागरिकांना पूर संरक्षणाबद्दल मार्गदर्शन देऊन सतर्क व प्रशिक्षित करावे.